भारतात झिका व्हायरस : गुजरातमध्ये 3 रुग्ण आढळले

0

दक्षिण अमेरिकन राष्ट्रांमध्ये पसरलेल्या घातक झिका व्हायरसचा भारतात प्रादुर्भाव होतो आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनाइजेशनने याबाबत अधिकृत दुजोरा दिला. देशात झिकाची तीन प्रकरणे समोर आली असून तिन्ही रुग्ण अहमदाबादेतील आहेत. त्यापैकी एक रुग्ण गर्भवती आहे. या सर्वांची चाचणी जानेवारीत घेण्यात आली होती.
झिका व्हायरस प्रामुख्याने डासांमुळे पसरतो. प्रामुख्याने याची लागण नवजात बालकांना होते. याचा सर्वप्रथम पत्ता ब्राझीलमध्ये लागला. गेल्या दोन वर्षांपासून ब्राझीलमध्ये हजारो नवजात बालकांना याची लागण झाली. गर्भवती मातांना या रोगाची लागण झाल्यास जन्म घेणाऱ्या मुलाच्या मेंदू वाढत नाही. परिणामी डोक्‍याचा आकारही बदलतो. त्यामुळेच, ब्राझील आणि इतर दक्षिण अमेरिकन राष्ट्रांनी काही दिवस गर्भधारणा करू नये असे निर्देश आपल्या नागरिकांना दिले होते.
गांधीनगर येथील इंडियन इंस्टीट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ (IIPH)चे प्राध्यापक दीपक सक्‍सेना यांनी सांगितल्याप्रमाणे, ‘आता आपल्याला अधिक सतर्क व्हावे लागणार आहे. झिका आणि डेंग्यू व्हायरस एकसारखेच आहेत. झिकाचा फैलाव सुद्धा झपाट्यानेच होतो.’

Share.

About Author

Leave A Reply