‘सचिन: अ बिलियन ड्रीम्स’मध्ये असे काय आहे की आपण हा चित्रपट बघायला हवा ?

0

काही इतर फिक्शन चित्रपटासारखा सचिन: अ बिलियन ड्रीम्स हा चित्रपट नाही, तर ही एक डाक्युफिल्म आहे. पण तरी देखील या चित्रपटाची वाट फक्त सचिनचे चाहतेच नाही तर सर्वच बघत होते. अखेर शुक्रवारी हा चित्रपट रिलीज झाला आहे. आम्ही तुम्हाला हा चित्रपट का बघावा याची कारणे सांगणार आहोत.

या चित्रपटात सचिनच्या आयुष्यातील अनेक वैयक्तिक आणि प्रोफेशनल किस्से दाखवण्यात आले आहेत. त्याचबरोबर या चित्रपटात सचिनला क्रिकेटशिवाय आणखी काय आवडतं हे आपल्याला पाहायला मिळते. मॅच सुरू असताना सचिन काय करतो, सचिनला काय आवडते काय आवडत नाही हे देखील चित्रपटातून दाखवण्यात आले आहे.

सचिनच्या यशात कोणकोणत्या व्यक्तींचा हात आहे आणि ते वेळोवेळी सचिनच्या पाठिशी कसे उभे होते हे या आपल्याला या चित्रपटातून कळते. सचिनची कोणत्या क्रिकेटरसोबत चांगली मैत्री आहे. तसेच इतर क्रिकेटर सचिनबाबत काय व्यक्त होतात हे या चित्रपटातून कळते. एकेकाळी इंज्युरीने त्रस्त झालेला सचिन क्रिकेटमधून निवृत्त व्हायचा निर्णय घेतो. मात्र त्यावेळी त्याला एका व्यक्तीचा फोन येतो आणि ती व्यक्ती त्याला निवृत्त न होण्याचा सल्ला देते. अशा अनेक सचिनवर प्रेम करणा-या आणि वेळोवेळी मदत करणा-या व्यक्ती यात आहेत.

आपल्या वैयक्तिक आयुष्याबाबत सचिन जास्त बोलत नाही. पण सचिन आणि अंजलीची भेट कशी झाली. त्यांनी लग्नाचा निर्णय कधी घेतली. त्यांची प्रेमकहाणी यात आपल्याला पाहायला मिळते एक खेळाडू म्हणून सचिन ग्रेट असला तरी तो एक वडील आणि एक पती म्हणून कसा आहे हे यात दाखवण्यात आले आहे. यात सचिनच्या आयुष्यातील वैयक्तिक व्हिडीओ फुटेजचा वापर करण्यात आला आहे. ते याआधी कुणाला पाहायला मिळाले नाही. चित्रपटाच्या निमित्ताने ते तुम्हाला पाहता येऊ शकते. सचिन सामाजिक कार्यातही अग्रेसर असतो. या चित्रपटात त्याच्या सामाजिक कार्याचा देखील समावेश करण्यात आला आहे.

Share.

About Author

Leave A Reply