टीटीएमएम (तुझं तू माझं मी ) चित्रपटाचा इंटरेस्टिंग टिझर रिलीज

0
 टीटीएमएम तुझं तू माझं मी चित्रपटाचा नुकताच टिझर रिलीज करण्यात आला आहे, चित्रपटाचा टिझर चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढवतो. नेहा महाजन आणि ललित प्रभाकर स्टारर हा चित्रपट एक फॅमिली ड्रामा असून त्यात रोमान्स, ह्युमर, इमोशन्स या सगळ्या गोष्टींचा आस्वाद प्रेक्षक घेऊ शकणार आहेत. चित्रपटाच्या फर्स्ट लुकची सगळीकडे वाहवा झालीच पण चित्रपटाचा टिझर देखील तितकाच प्रभावी आहे. चित्रपटाला संगीतकार पंकज पडघन यांनी खूप छान म्युजिक दिलं आहे. ललित आणि नेहा मधील केमिस्ट्री हे चित्रपटाचं प्रमुख आकर्षण आहे. कुलदीप जाधव दिग्दर्शित आणि इरॉस इंटरनॅशनल व वैशाली एंटरटेनमेंट प्रस्तुत, ‘टीटीएमएम’ तुझं तू माझं मी चित्रपट येत्या १६ जूनला प्रदर्शित होणार आहे.
Share.

About Author

Leave A Reply