सॅमसंगचा नवा स्मार्टफोन भारतात दाखल

0

जागतिक स्तरावरील स्मार्टफोन विक्रीत अव्वल स्थानी असलेल्या सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्सने आपला आणखी एक नवा स्मार्टफोन भारतीय बाजारात आणला आहे. ‘सॅमसंग गॅलेक्सी सी ९ प्रो’ असे या स्मार्टफोनचे नाव आहे. हा स्मार्टफोनची ऑनलाईन विक्री येत्या २७ जानेवारीपासून सुरू होणार आहे.

‘सॅमसंग गॅलेक्सी सी ९ प्रो’ या स्मार्टफोनची किंमत ३६ हजार ९०० रुपये आहे. काळ्या आणि गोल्डन रंगामध्ये हा फोन उपलब्ध आहे.

या स्मार्टफोनची प्री-बुकींग करणा-या ग्राहकांसाठी कंपनीने १२ महिन्यातून एकदा स्क्रिन बदलण्याची गॅरंटी दिली आहे. हा स्मार्टफोन येत्या फेब्रुवारीपासून रिटेल दुकानांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध करण्यात येणार आहे.

असा आहे ‘सॅमसंग गॅलॅक्सी सी ९ प्रो’

» ६ इंचाचा डिस्प्ले

» ६४ जीबी मेमरी

» १.४४ गिगाहर्टझ ऑक्टाकोर प्रोसेसर

» सहा जीबी रॅम

»१६ मेगापिक्सेल रेयर कॅमेरा

»१६ मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा

» अँड्रॉईड ६.० मार्शमॅलो

» वायफाय, एनएफसी, ब्लूटूथ,

» ४००० एमएएच बॅटरी

» किंमत -३६ हजार ९०० रुपये

Share.

About Author

Leave A Reply