सॅमसंगचा आणखी एक नवा स्मार्टफोन लाँच

0

सॅमसंग मोबाईल कंपनीने आणथी एक नवा स्मार्टफोन मोबाईल विश्वात लाँच केला आहे. ‘सॅमसंग गॅलेक्सी सी ८’ हा नवा स्मार्टफोन लवकरच भारतीय बाजारात दाखल होणार आहे. कंपनीने या स्मार्टफोनची किंमत अद्यापही गुलदस्त्यात ठेवणे पसंत केले आहे.

कंपनीने हा स्मार्टपोन चीनमध्ये लाँच केला. काळ्या, गोल्ड आणि रोज गोल्ड रंगामध्ये हा स्मार्टफोन उपलब्ध होणार आहे. या स्मार्टफोनमध्ये दोन रिअर कॅमेरे देण्यात आले आहेत.

हा स्मार्टफोन भारतात केव्हा लाँच होईल याबाबत कंपनीने कोणतीही माहिती दिलेली नाही.

‘सॅमसंग गॅलेक्सी सी ८’ चे फिचर्स?

» ५.५ इंचाचा डिस्प्ले

» तीन जीबी रॅम

» १.६९ ऑक्टा-कोर प्रोसेसर

» ३२ जीबी इंटरनल मेमरी

» १०८० X १९२० पिक्सल स्क्रिन रेझ्योल्यूशन

» १३ मेगापिक्सेल रेयर कॅमेरा

» १६ मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा

» अँड्रॉईड ७.१.२. नुगट

» ३००० एमएएच बॅटरी

Share.

About Author

Leave A Reply