अभिनेता सलमान खानने लॉन्च केली ‘बिइंग ह्यूमन’ सायकल

0

अभिनेता सलमान खान याचे फिटनेस प्रेम कोणापासून लपून राहिलेले नाही. सलमानला सायकलिंग करणे सर्वात जास्त आवडते. काही दिवसांपूर्वी सल्लू शाहरुखसोबत सायकल चालवताना दिसला. जागतिक पर्यावरण दिनानिमित्ताने सलमानने आपल्या बिइंग ह्यूमन ब्रान्डच्या माध्यमातून इलेक्‍ट्रिक सायकल लॉन्च केली आहे.
दोन प्रकारची ही सायकल चार रंगात उपलब्ध असणार आहे. पांढरा, पिवळा, लाल आणि काळा अशा रंगात ही सायकल मिळणार आहे. याबाबत खुद्द सलमानने ट्विट करुन माहिती दिली. सलमानने एक व्हिडिओही शेअर केलाय. यात तो आपल्या भावासोबत सायकल चालवताना दिसत आहे.

Share.

About Author

Leave A Reply