जुलै अखेरीस राजकीय प्रवेशाची घोषणा करणार रजनीकांत

0

जुलै अखेरीस दक्षिणेचे सुपरस्टार रजनीकांत राजकीय प्रवेशाची घोषणा करु शकतात अशी माहिती रजनीकांत यांचे बंधु सत्यनारायण राव गायकवाड यांनी दिली. बंगळुरुमध्ये सत्यनारायण राव राहतात. राजकारणात रजनीकांत यांनी प्रवेश करावा अशी लोकांची इच्छा असून त्यांनी चाहते आणि हितचिंतकांशी चर्चेची पहिली फेरी पूर्ण केली आहे असे सत्यनारायण यांनी सांगितले.

अलीकडेच सलग चार दिवस रजनीकांत यांनी आपल्या चाहत्यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी राजकीय प्रवेशाचे स्पष्ट संकेत दिले होते. सत्यनारायण यांचे त्यापार्श्वभूमीवर विधान महत्वाचे आहे. रजनीकांत यांनी चारदिवसाच्या चाहत्यांबरोबरच्या भेटीत अनेक राजकीय विधाने केल्यामुळे तामिळनाडूतील राजकारण चांगलेच ढवळून निघाले. काही संघटनांनी रजनीकांत यांच्या कन्नड असण्यावर आक्षेप घेत त्यांच्या राजकीय प्रवेशाला विरोध केला.

Share.

About Author

Leave A Reply