मिथिला पारकर बॉलिवूडमध्ये

0

मुरांबा या मराठी सिनेमातून घराघरात पोहोचलेली मिथीला पालकर आता बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. मिथीला पालकर मल्याळम स्टार डलक्यूअर सलमान आणि इरफान खान याच्यासोबत काम करणार आहे. मिथीलासाठी ही मोठी संधी मानली जात आहे. मल्याळम सिनेमांमधील सुपरस्टार डलक्यूअर सलमान हा सुद्धा या सिनेमातून हिंदी सिनेमात पदार्पण करीत आहे. इरफान खान आणि मिथीला यात असल्याने या सिनेमाची उत्सुकता वाढली आहे. आता यात मराठमोळ्या मिथीलाला काय भूमिका असणार हे बघणे उत्सुकतेचे ठरणार आहे. प्रसिद्ध निमार्ते रॉनी स्क्रूवाला या सिनेमाची निर्मिती करणार आहेत. सिनेमाचं दिग्दर्शन नवोदित दिग्दर्शक आकर्ष खुराणा तर लेखन हुसेन दलाल करणार आहे.

Share.

About Author

Leave A Reply