तर एके दिवशी मराठी सिनेमांचं अस्तित्व संपणार – महेश मांजरेकर

0

मराठी प्रेक्षक जर पुन्हा मराठी सिनेमाकडे आला नाहीत तर एका वर्षांत मराठी सिनेमा मरेल, त्याला मुठमाती द्यावी लागेल, अशी खंत ज्येष्ठ चित्रपटकर्मी महेश मांजरेकर यांनी व्यक्त केली आहे. सध्या आसा समजलं जातेय कि मराठी सिनेमा खूप भरभराटीत आहे पण हे सत्य नसून एक गैरसमज आहे. वास्तविक पाहता मराठी सिनेमाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली आहे.

हिंदी ही आपली राष्ट्रभाषा आहे असे पखरशाने महाराष्ट्रातच समजले जाते. परंतु दक्षिणेत मात्र हिंदीपेक्षा अधिक त्यांच्या भाषेतील चित्रपट पाहिले जातात.हिंदी चित्रपटांना मिळणारे एक तृतियांश उत्पन्न महाराष्ट्रातून पाहणाऱ्या प्रेक्षकांमुळे मिळते. ‘दंगल’ या चित्रपटाच्या साडेतीनशे कोटी पैकी १२० कोटी महाराष्ट्रातून आले.या प्रेक्षकांना प्रेक्षकांना मराठी सिनेमाकडे आकर्षित करणे हे अतिशय महत्वाचे आहे. दक्षिणेकडे त्यांच्या भाषेचे जसे प्रेम आहे, तसे आपल्याकडे मराठी विषयी निर्माण हकरणे हि आज काळाची गरज आहे.

मराठी मध्ये सध्या वर्षाला ६०ते ७० चित्रपट येतात परंतु यातले काहीच चित्रपट प्रदर्शित होतात आणि काही तसेच पडून राहतात. मराठी निर्मात्यांमध्ये शर्यती सुरु आहेत ज्याचा वाईट परिणाम होताना दिसत आहे. मराठी चित्रपटांची संख्याही कमी होऊन मर्यादित प्रमाणात सिनेमे बनले पाहिजेत. प्रत्येक जण वेगवेगळे चित्रपट बनवत आहे. त्यापेक्षा लोकांनी एकत्र येऊन ४० सिनेमे काढले तर मराठी चित्रपटाचे बजेट नक्कीच वाढेल.‘बाहुबली’ हा प्रादेशिक भाषेतील चित्रपट साडेतीनशे कोटी रुपये खर्च करून बनविला होता परंतु मराठी इंडस्ट्री मध्ये साडेतीन कोटी हे हे फार मोठे बजेट आहे.

आपले निर्माते एकमेकांचे पाय खेचतात याची मांजरेकर याना खंत वाटते. मराठी इंडस्ट्री मध्ये ‘टॅलेंट’ची कमतरता नाही. याचं उद्धरण म्हणजे प्रत्येक राष्ट्रीय चित्रपटात मराठी चित्रपट बाजी मारत आहे. आसा असताना क्की चुकतेय कोठे? ‘कासव’सारख्या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळून अनेक दिवस उलटून गेले तरीही हा चित्रपट प्रदर्शित झाला नाही हि फार गंभीर बाब आहे. निर्मात्यांना एकत्र येऊन यावर काही विचार कार्याला हवा. सर्वाना एकत्र येऊन संगठीत पणे काम कार्याला हवे.

Share.

About Author

Leave A Reply