सामाजिक न्यायमंत्री बडोलेंच्या मुलीने नाकारली सरकारी शिष्यवृत्ती

0

सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्या मुलीने सरकारी शिष्यवृत्ती नाकारली आहे. पंतप्रधान मोदी देशवासियांना अनुदान सोडण्याचे आवाहन करत असताना त्यांच्याच पक्षाच्या मंत्र्यांकडून त्याविरुद्ध कृती केली जात असल्याने वाद निर्माण झाला होता. अखेर बडोले यांची कन्या श्रुती हिने सरकारी शिष्यवृत्ती सोडणार असल्याचे म्हटले आहे. एका पत्रातून श्रुती बडोलेने याबद्दलची माहिती दिली.

‘माझ्यात गुणवत्ता आहे. मात्र माझे वडिल मंत्री आहेत. त्यामध्ये माझा काय दोष?,’ असा सवाल श्रुतीने या पत्रातून उपस्थित केला आहे. ‘मी युकेमधील ससेक्स विद्यापीठातून एम. एस्सीचे शिक्षण पूर्ण केले. त्या ठिकाणी माझा प्रवेश आणि शिक्षण गुणवत्तेनुसार झाले. विद्यापीठाने मला गुणवत्तेच्या जोरावरच शिष्यवृत्ती दिली. त्यानंतरचे माझे शिक्षणही गुणवत्तेनुसारच झाले. त्यावेळी माझे वडिल मंत्रीदेखील नव्हते,’ असे तिने पत्रात म्हटले आहे.

याआधी परदेशातील विद्यापीठांनी मला गुणवत्तेच्या जोरावर शिष्यवृत्ती दिली आहे. मात्र पीएचडीसाठी शिष्यवृत्ती मिळण्याची सवलत विद्यापीठात नाही. त्यामुळेच राज्य सरकारकडे शिष्यवृत्तीसाठी अर्ज केला होता. जगातील पहिल्या शंभर विद्यापीठांमध्ये प्रवेश मिळत असल्यास विद्यार्थ्याला आर्थिक निकषांची अट नसते. मात्र तरीही वडिल मंत्री असल्याने वाद होईल, याची कल्पना होती,’ असे म्हणत श्रुतीने स्वत:ची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला.

Share.

About Author

Leave A Reply