28 फेब्रुवारीपर्य़ंत मोबाइल क्रमांक आधार कार्डशी लिंक करा

0

तुम्ही आपला मोबाइल क्रमांक आधार कार्डशी लिंक केला नसेल तर लवकर लिंक करा, कारण 28 फेब्रुवारी 2018 नंतर आपला क्रमांक बंद होईल. याबाबत केंद्र सरकारने सूचना दिल्या आहेत.

मोबाइल क्रमांकामुळे होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी हा क्रमांक आधार कार्डशी लिंक करणे गरजेचे आहे. या वर्षी फेब्रुवारीमध्ये उच्च न्यायालयाने सरकारला एक वर्षात सध्या असलले शंभर कोटी आणि भविष्यात होणारे मोबाईलधारक यांचे क्रमांक आधार कार्डशी लिंक करणे करण्याच्या सूचना दिल्या होत्या. यामुळे आधार कार्ड आणि सीम कार्ड यांच्यामुळे त्या व्यक्तीची ओळख पटेल.

उच्च न्यायालयात लोकनिती या स्वंयसेवी संस्थेने दाखल केलेल्या जनहीत याचिकेवर सुनावणी सुरू आहे. या याचिकेनुसार मोबाईल धारकाची ओळख, पत्ता आदी माहिती उपलब्ध पाहिजे. कोणतेही सीम तपासणीशिवाय देऊ नये, याबाबत केंद्र सरकार आणि ट्रायला सूचना देणे गरजेचे आहे. तपासणी न करता सीम कार्ड दिल्यामुळे पैसे काढण्याच्या व्यवहारात फसवणूक होऊ शकते, असे उच्च न्यायालयाने नमूद केले आहे.

सध्या भारतात मोबाईल धारकांची संख्या 105 कोटी आहे. 90 टक्के ग्राहक हे प्री-पेड कनेक्शन वापरतात. आता अशी प्रणाली येणार आहे की ज्यामुळे मोबाईल सीम आणि आधार एकमेंकाशी जोडले जातील.

Share.

About Author

Leave A Reply