भारताचा पुढील वर्षी इंग्लंड दौरा

0

भारताचा संघ पुढील वर्षी (२०१८) इंग्लंडचा दौरा करेल. ७० दिवसांच्या दौ-यात पाच कसोटी सामन्यांसह प्रत्येकी तीन वनडे आणि टी-२० सामन्यांचा समावेश आहे. १९५९ नंतर प्रथमच भारताचा संघ इंग्लिश भूमीत पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळेल. भारतापूर्वी पाकिस्तान आणि भारताच्या दौ-यानंतर ऑस्ट्रेलिया इंग्लंडला जाईल. भारताविरुद्धची पाच सामन्यांची कसोटी मालिका ही इंग्लंडच्या पुढील हंगामाचे प्रमुख वैशिष्टय़ असेल, असे इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्डाचे (ईसीबी) मुख्य कार्यकारी अधिकारी टॉम हॅरिसन यांनी ईसीबीतर्फे प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

१ ते ५ ऑगस्टदरम्यान खेळल्या जाणा-या एजबॅस्टन कसोटीने मालिकेला सुरुवात होईल. त्यानंतर लॉर्ड्स (९ ते १३ ऑगस्ट), ट्रेंटब्रिज (९ ते २२ ऑगस्ट), रोस बॉल (३० ऑगस्ट ते ३ सप्टेंबर) आणि द ओव्हल (७ ते ११ सप्टेंबर) येथे कसोटी सामने होतील. १९५९ म्हणजे तब्बल ५८ वर्षानंतर भारताचा संघ इंग्लंडमध्ये पाच सामन्यांची मालिका खेळेल. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारताचा संघ सध्या आयसीसी कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानी आहे. कसोटी मालिका प्रमुख आकर्षण असले तरी तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेने (३ जुलै) भारताच्या इंग्लिश दौ-याची सुरुवात होईल. त्यानंतर वनडे मालिका खेळली जाईल. इंग्लंडच्या आगामी मायदेशातील हंगामाची (समर) सुरुवात पाकिस्तानविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेने होईल. मे-जून महिन्यात लॉर्ड्स आणि हेडिंग्लेवर हे सामने होतील. पाकिस्ताननंतर ऑस्ट्रेलियाचा संघही इंग्लंडशी दोन हात करेल. पाच वनडे आणि एकमेव टी-२० मालिका असा हा दौरा आहे.

Share.

About Author

Leave A Reply