भारतीय क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा संस्मरणीय

0

तिन्ही प्रकारांतील निर्भेळ यश (व्हाईटवॉश) पाहता श्रीलंका दौरा संस्मरणीय ठरल्याचे भारताचा कर्णधार विराट कोहलीने एकमेव टी-२० लढतीनंतर म्हटले.

कसोटी, वनडे आणि टी-२० अशा तिन्ही फॉरमॅटमधील विजयाने आम्ही भारावलो आहोत. यापूर्वी असे घवघवीत यश आम्हाला मिळाले नव्हते. सातत्यपूर्ण विजयाचे श्रेय संघ सहका-यांना जाते. आमच्या दुस-या फळीनेही चांगली कामगिरी केली. वरचे रँकिंग पाहता श्रीलंका दौ-यात भारताचे पारडे जड होते. मात्र आम्ही प्रतिस्पध्र्याना कमी लेखले नाही. या दौ-यात आम्ही अनेक प्रयोगही केले. त्याचा फायदाही झाली. वैयक्तिक कामगिरीबाबत बोलायचे तर माझी फलंदाजी चांगली झाली. प्रत्येक फॉरमॅटला अनुकूल खेळण्याचा मी प्रयत्न केला,’’ असे विराटने म्हटले.

आर. प्रेमदासा स्टेडियमवर बुधवारी झालेल्या एकमेव टी-२० लढतीत श्रीलंकेला ७ विकेट आणि ४ चेंडू राखून हरवत भारताने विजयाचे वर्तुळ पूर्ण केले. विराट कोहली आणि सहका-यांचा दौ-यातील हा सलग नववा विजय आहे. ५४ चेंडूंत ७ चौकार आणि एका षटकारासह ८२ धावांची खेळी करणा-या कोहलीला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. त्याला मनीष पांडेची (३६ चेंडूंत नाबाद ५१ धावा) चांगली साथ लाभली. विराटची कारकिर्दीतील ती ५०वी टी-२० लढत होती.

भारताची ऑस्ट्रेलियाशी बरोबरी
तीन सामन्यांची कसोटी, पाच सामन्यांची वनडे आणि एकमेव टी-२० असे नऊ सामने जिंकत भारताने श्रीलंकेला तिन्ही प्रकारांत ‘व्हाईटवॉश’ दिला. अशी करामत यापूर्वी केवळ ऑस्ट्रेलियाला साधता आली होती.

सर्वाधिक धावा करणारा भारताचा फलंदाज
टी-२० प्रकारात सर्वाधिक धावा करणारा भारताचा फलंदाज म्हणून विराट कोहलीची नोंद झाली आहे. ५० सामन्यांत त्याच्या खात्यात ६९०७ धावा आहेत. विराटने डावखुरा फलंदाज सुरेश रैनाला (६८७२ धावा) मागे टाकले.

टी-२० प्रकारात सर्वाधिक धावा करणा-या जगभरातील फलंदाजांमध्ये विराट आठव्या स्थानी आहे. २००९मध्ये मायदेशातील मालिकेत त्यांनी पाकिस्तानला ३-०, ५-० आणि १-० अशा फरकाने हरवले होते.

विराटच्या नावे आणखी विक्रम
विराटने ८२ धावांची ‘मॅचविनिंग’ खेळी करताना धावांचा पाठलाग करताना सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम आपल्या नावे केला. धावांचा पाठलाग करताना २५ सामन्यांत त्याने १०१६ धावा फटकावल्यात. त्यात ११ अर्धशतकांचा समावेश आहे. कोहलीने न्यूझीलंडच्या ब्रेंडन मॅककलमला (३८ सामन्यांत १००६ धावा) मागे टाकले. टी-२० प्रकारात जबरदस्त फॉर्म राखताना भारताच्या कर्णधाराने मागील १० डावांत ८२, नाबाद ८२, ५५, नाबाद ४१, नाबाद ५६, ४९, ५०, नाबाद ७२, नाबाद ५७, ५४ अशा धावा केल्यात. या दहा डावांत त्याने ९९.६६च्या सरासरीने धावा फटकावल्यात

Share.

About Author

Leave A Reply