फ्लिपकार्ट, शॉपक्लूजवर बंपर सेल

0

पावसाला नुकतीच सुरूवात झाली असून अनेकजण खरेदीचा विचार करतात. खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. ‘फ्लिपकार्ट’ आणि ‘शॉपक्लूज’ या ऑनलाईन शॉपिंगसाईटवर कंपन्यांनी बंपर सेल ठेवला आहे. या सेलमध्ये अनेक वस्तूंवर ५० ते ८० टक्के सुट देण्यात आली आहे.

‘फ्लिपकार्ट’ने फॅशन आणि इतर वस्तूंवर ५० टक्क्यांहून अधिक सूट दिली असून पुढचे ९ दिवस ग्राहकांना याचा लाभ घेता येणार आहे. ‘शॉपक्लूज’च्या सवलतीचा हंगाम आठवडा भर असणार आहे. यात होम, किचन, इलेक्ट्रॉनिक्स आणि फॅशन प्रोडक्ट्सवर घसघशीत सूट देण्यात आली. ‘एचडीएफसी’ बँकेच्या डेबिट अथवा क्रेडिट कार्ड धारकांना तर त्यात आणखी १० टक्के सवलतीचा लाभ घेता येणार आहे.

‘फ्लिपकार्ट’ने या बंपर ऑफरसह ग्राहकांसाठी ‘बिड अँड विन’ या अनोख्या स्पर्धेचे आयोजन केले आहे. यात एखाद्या वस्तूवर सर्वात कमी बोली लावण्याची किमया करणा-या ग्राहकाला १३,९९५ रुपये किमतीचे घड्याळ बक्षिस म्हणून दिली जाणार आहे

Share.

About Author

Leave A Reply