बटाट्याचा कीस

0

साहित्य:-
चार मोठे बटाटे, दाण्याचे कूट, चवीपुरते मीठ, चिमुटभर साखर, तूप एक मोठा चमचा, जिरे फोडणीपुरते, तीन हिरव्या मिरच्यांचे तुकडे, बारीक चिरलेली कोथिंबीर, खवणलेला ओला नारळ.
कृती :-
१) सर्वप्रथम बटाटे किसून घ्यावेत. त्यानंतर एक पातेली गॅसवर गरम करत ठेवावी.
२) पातेली थोडी गरम झाल्यावर त्यात तूप घालावे. तूप गरम झाल्यावर जिरे घालावे.
३) आता हिरव्या मिरच्यांचे तुकडे घालावेत. मिरच्याचा रंग पांढरा झाल्यावर त्यावर बटाट्याचा कीस घालावा.
४) आता झाकण टाकून बटाट्याचा कीस शिजवावा. मग झाकण काढून त्यात मीठ, साखर, दाण्याचे कूट घालावे. व परत एक वाफ काढावी. गॅस बंद करावा. बटाट्याचा कीस तयार आहे.
५) आता ओला नारळ व कोथिंबीर घालून गरम गरमच खायला द्यावा.

Share.

About Author

Leave A Reply