दहशतवादी हल्ल्यात २ जवान शहीद

0

जम्मू-काश्मीरमधील अनंतनागमध्ये शुक्रवारी सकाळी दहशतवाद्यांनी केलेल्या अंदाधुंद गोळीबारात सीआरपीएफचे दोन जवान शहीद झाले.

अनंतनागमधील शीरपोरामध्ये सकाळी सीआरपीएफच्या पथकावर दहशतवाद्यांनी गोळीबार केला. या हल्ल्यात दोन जवान गंभीर जखमी झाले. त्यांना रुग्णालयात घेऊन जात असताना त्यांचा मृत्यू झाला.

गोळीबारानंतर दहशतवादी घटनास्थळावरून पसार झाले. त्यांचा कसून शोध घेण्यात येत असून त्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

Share.

About Author

Leave A Reply