by मनोज नरे
<p>स्वामी समर्थ स्वामी समर्थांचा प्रथम फोटो घेण्याचा मान कोड्याक कंपनीस जातो. त्याचे असे झाले... जार्ज ईस्टमैन याने कोड्याक क्यामे~याचा शोध लावला. साधारण १८५५ते 1870 मधली हि गोष्ट आहे आपल्या प्रोडक्ट चा खप वाढावा म्हणून कंपनीने संत पुरुषांचे फोटो घेण्याचे ठरवले. व त्या साठी ब्रह्म चैतन्य राजा स्वामी समर्थ यांचे फोटो घेण्याचे ठरले. ब्रिटीश सरकारला पण स्वामी चे महत्व माहिती असल्याने त्यांनी कंपनीस त्यांचा बेस्ट फोटो ग्राफार नियुक्त करण्याचे आदेश दिले. कंपनीने पण ते मानले व आपल्या बेस्ट फोटो ग्राफार ला क्यामेरा व इतर साधने घेऊन भारतात पाठवले, फोटो ग्राफार अक्कल कोट मध्ये आला व त्याने काही भक्तांना स्वामीचे फोटो काढण्याचा मनोदय सांगितला. पण भक्त म्हणाले कि स्वामी च्या संमतीशिवाय हे शक्य नाही. पण फोटो ग्राफार ला आपल्या कौशल्यावर विज्ञान वर विश्वास असल्याने त्यांनी भक्तास सांगितले कीमी स्वामीच्या न कळत फोटो घेतो स्वामीला कळणार पण नाही. व त्याने तसे केले व फोटो डेव्हलप केले ..फोटो घेऊन तो स्वामीच्या दरबारात आला ... त्याला खात्री होती कि स्वामी खूप खुशहोणार ..कारण त्या काळात हि नवीन कला होती. स्वामी फोटो नबघता आपल्या भक्तांना फोटो दाखवण्यास सांगितले. भक्तापैकी फोटो बघत हा रामाचा तर कुणीहा ख्न्डोबाचा अदभूत अवतार दिसतो असे म्हणत आश्चर्य व्यक्त केले. फोटो ग्राफार ने नंतर फोटो स्वामी कडेदिला व फोटो बघत स्वामी हसू लागले व म्हणाले मी असा दिसतो?? असे म्हणत त्याने तो फोटो फोटो ग्राफार च्या हातात दिला .. फोटो पाहिल्यावर फोटो ग्राफार चकित झाला हातात एका माकडाचा फोटो होतो.. असे कसे झाले हे त्याला कळत नव्हते.. त्याने पटकन स्वामीचे पाय पकडले व संमती विना फोटो घेतल्याची दिलगीरी व्यक्त केली स्वामी हसले.. फोटो ग्राफार ने आमचे कंपनी नवी आहे आपला फोटो घरा घरात पोहोचण्याचा योग्यतेचा आहे म्हणून व सेल वाढावा म्हणून हे केले व स्वामेची क्षमा मागतली. कारुण्य सागर स्वामीनी त्याला क्षमा केली व पुन्हा फोटो घेण्याची अनुमती दिली. फोटो तर चांगले आलेच व घरा घरात पोहोचले.</p>
Tweet
- ·
- July 25, 2012 3:51 pm
Anil Kumar
<p>श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ</p>
- July 26, 2012
- ·
- Like