by मराठी प्लस
तणावमुक्त व्हायचं असेल, सिक्स पॅक अॅब्ज हवे असतील, वजन कमी करायचंय किंवा निरोगी जीवन जगायचं असेल... यापैकी काही करायचं असेल, तर दोन गोष्टी खूपच महत्त्वाच्या. एक तर तुमच्या शरीराला साजेसा व्यायाम आणि अर्थात जीवनपद्धती! सातत्याने व्यायाम करायचा असेल, तर त्याचा कंटाळा टाळायला हवा. काही स्मार्ट टिप्स पाळल्या, तर हे शक्य आहे.
> स्मार्टनेस हवा
कोणत्याही बाबतीत तुम्हाला यश मिळत असेल, तर ती गोष्ट करण्यात तुमचा रस टिकून राहतो. व्यायामही याला अपवाद नाही. पण, व्यायाम करतानाही स्मार्टनेसा हवा. तुम्ही कसा व्यायाम करणार, याचं नियोजन करा. व्यायामाचा तुमच्या शरीरावर काय परिणाम होतोय, याची नोंद ठेवायला हवी. शरीराच्या प्रगतीचं प्रगतीपुस्तक अपडेट ठेवायला हवं.
> ब्रेक घ्या
अनेकदा आवडता व्यायाम जास्त केला जातो. हे टाळायला हवं. व्यायाम परिपूर्ण हवा. त्यात ब्रेक हवा. यामुळे शरीराला विश्रांती मिळते, तरतरी येते. सतत तोच तोच व्यायाम केल्यामुळे येणारा कंटाळा टाळता येतो.
> बॅलन्स डाएट
व्यायामामुळे येणारा थकवा हा व्यायामाच्या कंटाळ्यास कारणीभूत ठरतो. यासाठी समतोल आणि परिपूर्ण आहार घेण्याची गरज असते. चांगल्या आहारामुळे तुमची एनर्जी लेव्हल वाढते. व्यायाम करण्यास अधिक आनंद वाटल्यामुळे व्यायाम टाळावासा वाटत नाही.
> जोडीदार हवा
व्यायाम करताना चांगला जोडीदार असायला हवा. त्यामुळे तुमच्या व्यायामात अचूकता येते. व्यायामाची प्रेरणा मिळते.
> बदल हवा
तोच तोच व्यायाम करत राहिलात, तर कंटाळा येतो. एखादा व्यायाम तुम्ही सतत सहा आठवडे करत राहिलात तर कॅलरी जाळण्याचं प्रमाण २५ टक्क्यांनी कमी होतं. त्यामुळे दर सहा आठवड्यांनी व्यायामात बदल करणं गरजेचं आहे. व्यायामातील विविधतेमुळे तुमचा कंटाळा कमी होतो शिवाय, वेगवेगळ्या व्यायाम प्रकारामुळे सर्व प्रकारच्या स्नायूंना मजबूती येते.
> मनाचाही व्यायाम हवा
व्यायाम करताना शरीराबरोबर मनाचाही विचार व्हायला हवा. स्नायूंच्या मजबूती सोबत मन:शांती देणाऱ्या योग, प्राणायमसाठी काही वेळ दिला पाहिजे. यामुळे तणाव कमी होतो. काम करायला अधिक स्फूतीर् मिळते. तुमचा परफॉर्मन्स खूप सुधारतो.
> दृष्टिकोन महत्त्वाचा
आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन खूप महत्त्वाचा असतो. तुमचं जीवन आनंददायी होणार, की कंटाळवाणं ते यावरच अवलंबून असतं. त्यामुळे सकारात्मक दृष्टिकोन ठेवा, तक्रारी टाळा. जे काम करताय ते मन लावून करा. मनात विकार साचू न देता मोकळ्या मनाने वावराल, तर आयुष्यात कशाचाही कंटाळा येणार नाही.
नमिता जैन
- क्लिनिकल एक्सरसाइज, लाइफस्टाइल अॅण्ड वेट मॅनेजमेण्ट एक्स्पर्ट

Tweet
-
February 8, 2012 3:50 pm
संतोष, Chandrakant Shinde, niranjan kurane and 10 others likes this.
SURESH RADE
khup sunder at mahatwachi suchana........mastach
- February 9, 2012
- ·
-
- ·
- 2 people
kakasaheb n walunjkar
लावण्याची खान ;माहितीची धमाल ;मराठीचा प्राण ;मूर्तिमंत सौन्दर्य ;अंगांगी ओतप्रोत आर्य सुवर्ण कसोटी कस ;फक्त ...मराठी प्लस
- February 12, 2012
- ·
-
Sanjay Gore
अतिशय महत्वाची व वास्तव माहिती ... प्रत्येकाने जरूर आचरणात आणावी .. खूप खूप धन्यवाद ..
- May 10, 2012
- ·
-